ऐन दिवाळीत औरंगाबादकरांवर घोंगावतेय ‘जलसंकट’!

ऐन दिवाळीत औरंगाबादकरांवर घोंगावतेय ‘जलसंकट’!

water problem

औरंगाबाद : मागील आठवड्यात एक दिवसाच्या अंतराने दोन दिवस तब्बल १८ तास जायकवाडी धरणातून महापालिकेच्या पंपगृहावरील पाणी उपसा बंद होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णतः बिघडले. पाणी वितरणाचे टप्पे विस्कळीत झाले. एकीकडे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे मात्र जुनी योजना पूर्णपणे कामातून गेल्याने वारंवार शहरावर जलसंकट घोंगावत आहे. आता तर ऐन दिवाळीच्या दिवसातच पाणी संकट कायम अाल्याने औरंगाबादकर धास्तावलेले आहेत.

मागील आठवड्यात चितेगाव परिसरात महावितरण कंपनीने २२० केव्ही उपकेंद्र व ३३ केव्ही विद्युत वाहिनीवर ब्रेकर तसेच तातडीच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी तब्बल सात तासांचा वेळ घेतला. या काळात पालिकेच्या पंपगृहाचा वीजपुरवठा बंद असल्याने तब्बल ९ तास शहराचे पाणी बंद होते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले होते. त्यातच २४ ऑक्टोबर रोजी १४०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलयोजनेवरील पंपगृहास वीजपुरवठा करणार्‍या सबस्टेशनवरील जॉइंटचे केबल जळाले. त्यामुळे पाणी उपसा बंद झाला. या जॉइंटची दुरूस्ती पाणी उपसा सुरू करण्यासाठी देखील ९ तासांचा अवधी लागला.

शुक्रवारी व रविवारी दोन दिवस तब्बल १८ तास पाणी उपसा बंद असल्याने शहरातील पाणी वितरणाचे टप्पे पूर्णतः विस्कळीत झाले होते. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असतांना पाणी पुरवठ्यात वारंवार व्यक्त येत असल्याने नागरिकांवर जलसंकटाची टांगती तलवार कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेली योजना अतिशय जीर्ण झाल्याने वारंवार पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर दिलेल्या वेळेत पूर्ण झाल्यास येणाऱ्या काही वर्षात औरंगाबादकरांना सुखाचे दिवस पाहता येतील. अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र तोपर्यंत जुन्या योजनेवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या