पाणी नसल्यामुळे ‘या’ गावात सोयरिकचं जुळेना

टीम महाराष्ट्र देशा : पाणी नसल्यामुळे अनेक अ़चणी येत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईमुळे चांगल्या शिकलेल्या तरुणांची लग्न जुळत नसल्याचे समोर आले आहे. मुरबाड तालुक्यातील खोपिवली येथे पाणी टंचाईमुळे सोयरिक जुळत नसल्याचे उघडकीस आले आहे. खोपिवली या गावातील विहीरी डिसेंबरमध्येच आटण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर गावातील महिलांची पाणी आणण्यासाठी वणवण सुरू होते. गावाची ही व्यथा संपूर्ण तालुक्याला माहिती असल्याने इथे कुणी सोयरिक करायला तयार नाही. त्यामुळे चांगले शिक्षण आणि नोकरी असूनही गावात तरुणांची लग्न जुळविताना अडचणी येत आहेत.

सध्या मुरबाड तालुक्यातील १६ गावे आणि सात वाड्यांना सहा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकण्यात येते. या विहिरीतील गढूळ पाणी पिऊन आदिवासींना आणि गावातील अनेकांना आपली तहान भागवावी लागत आहे. मात्र पाणी शुद्ध करण्याच्या उपाय योजना मात्र केल्या जात नासल्याचे दिसून येत आहे.

पाण्यासाठी महिलांचे होणारे हाल पाहून आता या गावात कुणी मुली द्याायला मागत नाहीत. मुलांना चांगल्या नोकऱ्या आहेत. शिक्षण आहे, पण त्यांची लग्ने जुळत नाहीत.