fbpx

चौकीदारी करणारा चौकीदार ‘देशाच्या चौकीदारा’मुळे बदनाम

फलटण – आजकाल चौकीदाराला ‘चौकीदार’ म्हणून हाक मारली तर ‘सहाब, चौकीदार बोलके गाली मत दो’ अशी विनंती केली जाते. इमानदारीने चौकीदारी करणारा चौकीदार ‘देशाच्या चौकीदारा’मुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

राष्ट्रवादीच्या फलटण येथील निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होत होते.
यावेळी मुंडे म्हणले की, सरकारमधील मंत्री महादेव जानकर ज्यांना सर्व गोष्टींची जाण आहे असा समज आहे, ते म्हणतात की आम्ही ऑनलाइन चारा देऊ. ऑनलाइन चारा कसा पोहोचेल हो? की त्याचीही अवस्था कर्जमाफीसारखी होईल. काय ऑनलाईन खेळ लावला आहे यांनी?.

इमानदारीने चौकीदारी करणारा चौकीदार ‘देशाच्या चौकीदारा’मुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही, असे यावेळी मुंडे म्हणले.