कौटुंबिक कारणातून वॉचमनची आत्महत्या

suicide

औरंंगाबाद : कौटुंबिक कारणातून वॉचमनने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी सुराणा नगरात उघडकीस आली. अर्जुन काशिनाथ सांगळे (वय ४७, रा. सुराणानगर) असे आत्महत्या केलेल्या वॉचमनचे नाव आहे.

सांगळे हे दारू पिण्याच्या सवयीचे होते. कौटुंबिक कारणातून त्यांनी सोमवारी मध्यरात्री नवीन बांधकाम सुरू असलेल्या बाथरूम मधील खिडकीला इलेक्ट्रिक वायरने गळफास घेतला. हि माहिती त्याच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी सांगळे यांना बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले.

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. त्यानंतर सकाळी त्यांचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी नेला. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP