कसोटी क्रिकेट पाहून वसीम जाफरला आली आईची आठवण

कसोटी क्रिकेट पाहून वसीम जाफरला आली आईची आठवण

vasim jafar

कानपूर : जवळपास तीन महिन्यांच्या रोमांचक T20 सामन्यांनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कसोटी क्रिकेट परतले आहे. टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वसीम जाफर (vasim jafar) हे पाहून खूप खूश झाला आहे. सोशल मीडियावर आपल्या मजेशीर कमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या जाफरला कसोटी क्रिकेट पाहिल्यानंतर आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाली आहे.

टीम इंडियाने शेवटचा कसोटी सामना 2-6 सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे खेळला. यानंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL), T20 विश्वचषक आणि न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिकेचा दुसरा टप्पा पार पडला. दरम्यान, आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे.

हा सामना पाहून वसीम जाफरने ट्विटरवर लिहिले की, ‘काही महिने टी-20 क्रिकेट पाहिल्यानंतर कसोटी क्रिकेट सामना पाहणे म्हणजे काही महिने घराबाहेर राहिल्यानंतर आईच्या हातचे अन्न खाण्यासारखे आहे.’

टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची होती, पण टीम इंडियाच्या कॅम्पमधील असिस्टंट फिजिओचा कोविड-19 चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मँचेस्टर कसोटी पुढे ढकलावी लागली. यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसले.

आयपीएल 2021 संपल्यानंतर टी-20 विश्वचषक सुरू झाला. टी-20 वर्ल्ड कप टीम इंडियासाठी अजिबात चांगला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन सामने गमावून टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. कर्णधार विराट कोहलीला कानपूर कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे. मुंबई कसोटीतून विराट संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन करेल.

महत्वाच्या बातम्या