मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि जया भारद्वाज यांनी १ जून २०२२ ला दिल्लीतील आग्रा येथे लग्नगाठ बांधली होती. दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएलच्या १५ व्या मोसमात खेळू शकला नाही. दीपकने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपक त्याच्या पत्नीसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओला चाहत्यांनीही भरपूर पसंत केले आहे. दीपकने गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान यूएईच्या स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान पत्नी जयाला प्रपोज केले होते. यापूर्वी दोघेही बराच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.
दीपक चहरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ त्याच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याचा आहे. व्हिडीओमध्ये दीपक आणि जया दोघेही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. दोघे पती-पत्नी या व्हिडिओत अक्षय कुमारच्या मिस्टर और मिसेस खिलाडी या सुपरहिट चित्रपटाच्या टायटल गाण्याने डान्स सुरू करतात. तर शेवटी व्हिडीओमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील बोले चुडिया, बोले कंगना हे गाणे सुरू आहे.
२९ वर्षीय वेगवान गोलंदाज दीपक चहरने हसणाऱ्या इमोजीसह व्हिडिओला कॅप्शन दिले की, ‘क्रिकेट सामन्यापेक्षा जास्त दबाव होता.’ दीपकने हॅशटॅगमध्ये आपला लग्नाचा डान्स आणि पहिले आणि शेवटचे लिहिले आहे. दीपक चहर सध्या दुखापतीतून सावरत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करताना दीपकच्या पाठीला जुनी दुखापत पुन्हा वाढली होती. त्यानंतर तो संपूर्ण आयपीएल २०२२ हंगामातून मधून बाहेर पडला होता. १५ व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने दीपकला १४ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते.
आयपीएल 2022 चेन्नई सुपर किंग्जसाठी त्वरीत विसरले जाणार होते, दीपक चहरचा संघ, जो आयपीएलमध्ये 9व्या क्रमांकावर होता . आयपीएलच्या 15 व्या हंगामात, 10 संघांच्या गुणतालिकेत CSK संघ नवव्या क्रमांकावर राहिला. या मोसमात त्याने रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती केली, पण पहिल्या आठपैकी 6 सामन्यात पराभव झाल्यानंतर जडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. शेवटी चेन्नईने महेंद्रसिंग धोनीला पुन्हा कर्णधार बनवले.
याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघ व व्यवस्थापन समिती सध्या त्याच दृष्टीने संघ बांधणी करत आहे. त्यामुळे दीपक चर्चे लवकरात लवकर दुखापतीतून सावरणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. दीपक चहरच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाला त्याची चांगलीच उणीव भासली होती.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<