Share

Phone Bhoot | ‘फोन भूत’ चित्रपटातील कलाकारांचा बघा ‘हा’ अनोखा हॅलोविन लुक

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी (Sidahant Chatruvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘फोन भूत’ (Phone Bhoot) मुळे चर्चेत आहे. फोन भूत या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यामुळे चाहत्यांच्या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. एकीकडे चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर मंडळी हॅलोविन पार्टीचा आनंद घेताना दिसले आहे. फोन भूत चित्रपटातील मुख्य कलाकार कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा हॅलोविन लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कतरीना कैफचा हॅलोविन लुक

फोन भूत चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कतरीना कैफने हॅलोविन पार्टीमध्ये लोकप्रिय डीसी कॉमिक्स पात्र हार्ले क्विन हिचा लुक केला आहे. यामध्ये तिने हार्ले क्विन सारखा पोशाख परिधान केलेला असून तिच्यासारखाच मेकअप केल्याचे दिसत आहे. या लुकसोबत कटरीना कैफ ने पती विकी कौशल सोबत एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फोटोशूट करताना दिसत आहे.

सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा हॅलोविन पार्टीतील लुक

फोन भूत या चित्रपटातील मुख्य अभिनेते ईशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी देखील त्यांच्या अनोख्या अवतारात हॅलोविन पार्टीमध्ये दिसले आहे. यामध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी याने सुपरहिरो शक्तिमानचा लूक केल्याचे दिसले आहे तर अभिनेता ईशान खट्टर याने चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरीतील प्रसिद्ध पात्र विली वोंकाचा लुक केला आहे.

फोन भूत चित्रपटातील कलाकारांचा हा हॉलविन लोक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहात्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कधी होणार फोन भूत (Phone Bhoot) चित्रपट रिलीज

फोन भूत या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. तर, या चित्रपटाचे लेखन रविशंकर आणि जसविंदर सिंग बाथ या जोडीने केले आहे. एक्सेल इंटरटेनमेंटसह रितेश सिधवानी आणि फरान अख्तर यांच्या नेतृत्वाखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. तर कतरिना कैफ, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यांच्याबरोबरच या चित्रपटांमध्ये जॅकी श्रॉफ, शिव चड्डा आणि निधी बिश्त हे कलाकार देखील सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. फोन बूट हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी (Sidahant Chatruvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) सध्या त्यांच्या आगामी चित्रपट …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now