‘तुझ्या माझ्या संसाराला..’मालिकेतील सिड-आदितीचा ‘तनु लेके…’गाण्यावरील रोमँटिक डान्स पहाच…!

‘तुझ्या माझ्या संसाराला..’मालिकेतील सिड-आदितीचा ‘तनु लेके…’गाण्यावरील रोमँटिक डान्स पहाच…!

hardhik

मुंबई : छोटया पडद्यावरील’तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका लोकप्रियतचे शिखर गाठले आहे. एकत्र कुटूंबातील मजा यात दाखविण्यात आले असून अशीच आजच्या २१ व्या शतकात एकत्र कुटुंब पद्धती काळाआड होत असल्याने कुटुंबाला बांधून ठेवणारी आणि नाती जपणारी ही मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहे. यात मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत असून त्यांचा व्हिडिओ चांगलाच गाजला.

मालिकेतील सगळी पात्र देखील खूप चांगल्या पद्धतीने रेखाटली आहेत. यात मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिड आणि आदिती ही जोडी महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडत आहे. त्याची प्रेमकहाणी देखील पाहायला सगळ्यांनाच आवडत आहे. अशातच या गोड जोडप्याचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडिओ एका सोहळ्यातील आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, आदितीने आकाशी रंगाची साडी नेसली आहे तर सिद्धार्थने देखील आकाशी रंगाचा कुर्ता घातला आहे. आदिती समोरून चालत येत असते तेव्हा सिद्धार्थ येतो आणि तिचा हात पकडतो.

त्यांच्या या व्हिडिओच्या ‘बॅकग्राऊंडला ‘तेनु लेके’ हे गाणे लागले. हा रोमँटिक व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र डान्स करताना बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. हार्दिकने या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत केलेले राणादा हे पात्र सगळ्यांना खूप आवडते होते. तसेच त्याच्या सिद्धार्थच्या या पात्राला देखील सगळ्यांची पसंती मिळत आहे. अमृताने या आधी ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘ललित २०५’, ‘दुहेरी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या