fbpx

वतन के आगे कुछ नहीं..खुद भी नहीं ; ‘राझी’चा ट्रेलर रिलीज

‘Raazi’ Official Trailer | Alia Bhatt, Vicky Kaushal | Directed by Meghna Gulzar | 11th May 2018

वेबटीम –  दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या ‘राझी’ या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आलिया भट्टने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आलियाचा अफलातून अभिनय ट्रेलरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गुप्तहेराच्या (स्पाय) आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. पुढील महिन्यात 11 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा संपूर्ण देशाला सार्थ अभिमान असतो. पण जे स्वतःची ओळख लपवून देशासाठी काम करतात त्यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना काहीच माहित नसते. राझी सिनेमातून अशा  असामान्य कतृत्व दाखवण्याच प्रयत्न करण्यात आला आहे. ‘फिलहाल’ आणि ‘तलवार’ सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या मेघना गुलझारने या सिनेमाच्या दिग्दर्शन केले आहे.

हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर राझी सिनेमाची गोष्ट आहे. या सिनेमाची गोष्ट सत्य घटनेवर आधारीत आहे. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात ‘सहमत’ एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते.

राझी ट्रेलर 

Raazi is based on a true story of a young girl, who was sent to Pakistan in 1971, to source out any information she could, as war was becoming imminent between India and Pakistan. It is the journey of an ordinary Indian girl, in extraordinary circumstances.

Release Date: 11th May 2018

Directed by: Meghna Gulzar

Produced by: Vineet Jain, Karan Johar, Hiroo Yash Johar & Apoorva Mehta

Co-produced by: Priti Shahani

Screenplay: Bhavani Iyer & Meghna Gulzar

Director of Photography: Jay I. Patel

Music: Shankar Ehsaan Loy

Lyrics: Gulzar Music on: Zee Music Company

1 Comment

Click here to post a comment