ग्रीन पार्कमध्ये कानपुरिया स्टाईलमध्ये गुटखा खाताना प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल, वसीम जाफरने केले ट्रोल

ग्रीन पार्कमध्ये कानपुरिया स्टाईलमध्ये गुटखा खाताना प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल, वसीम जाफरने केले ट्रोल

Wasim Jaffer

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याचा दुसरा दिवस आहे. लंचनंतर भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. शुभमन गिलने 52 आणि रवींद्र जडेजाने 50 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने 5 विकेट घेतल्या. किवी संघाचा पहिला डाव सुरु झाला आहे. टॉम लॅथमसह विल यंग क्रीजवर आहेत.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर प्रेक्षकांची संख्या बऱ्यापैकी दिसून आली. यातील एक दर्शक सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहे. प्रत्यक्षात कॅमेरामनने एका व्यक्तीचा व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान, कॅमेरामनने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये गुटखा खाणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवले. हा व्हिडिओ फुटेज चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सामना पाहण्यासाठी आलेला एक व्यक्ती तोंडात गुटखा घेऊन फोनवर बोलताना दिसत आहे.

 

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने ट्विटरवर आपल्या मीम्सद्वारे या प्रेक्षकाला खूप ट्रोल केले आहे. त्याने या व्यक्तीचा फोटो एका बॉलीवूड चित्रपटाच्या प्रसिद्ध डायलॉगशी जोडला. जाफरने ‘फिर हेरा फेरी’मधील बाबूराव पात्राचा डायलॉग निवडला आणि फोटोमध्ये लिहिले की, जो व्यक्ती या गुटखा खाणाऱ्याशी फोनवर बोलत आहे, तो म्हणतोय, ‘ए मुंह से सुपारी निकाल कर बात कर रे बाबा’ जाफरचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.