मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर चालू हंगामात रॉयल लंडन कप (Royal London Cup)मध्ये लँकेशायरकडून खेळताना दिसणार आहे. लँकेशायरने सुंदरचा परदेशी खेळाडू म्हणून समावेश केला आहे. लँकेशायर क्रिकेटने सुंदरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ”दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला वॉशिंग्टन सुंदर पुनर्वसनानंतर संघात सामील होणार आहे. इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची ही पहिलीच खेळी असेल”, असे लॅंकेशायरने सांगितले.
भारतातील अनेक खेळाडू याआधी इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. या मोसमात चेतेश्वर पुजाराने काऊंटीमध्ये आपले कौशल्य दाखवले आणि भारतीय संघात पुनरागमन केले. सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाबाहेर असलेल्या सुंदरकडूनही असेच काहीसे अपेक्षित असेल.
Washington Sundar will be playing for Lancashire in the Royal London Cup starting on August 2nd.pic.twitter.com/L84szZytUD
— Johns. (@CricCrazyJohns) June 22, 2022
”लँकेशायर क्रिकेट सोबत प्रथमच काऊंटी क्रिकेट खेळताना मी खूप उत्साहित आहे. इंग्लिश परिस्थितीत खेळणे माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव असेल आणि मी ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळण्याची वाट बघू शकत नाही. ही संधी दिल्याबद्दल मी लँकेशायर क्रिकेट आणि बीसीसीआय या दोघांचे आभार मानू इच्छितो आणि मी पुढील महिन्यात संघात सामील होण्यास उत्सुक आहे”, असे वॉशिंग्टन सुंदरने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –