ऑकलँड : ऑकलँडमध्ये पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ने आपल्या फलंदाजीने आश्चर्यचकत कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली आहे. त्याने शेवटच्या षटकांमध्ये 16 चेंडूत 37 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा अधिक होता. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले आहे. या खेळीनंतर वॉशिंग्टन सुंदरने माजी दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचे विक्रम मोडले आहेत.
वॉशिंग्टन सुंदरने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनचा न्यूझीलंडच्या भूमीवरील एक विक्रम मोडला आहे. न्युझीलँडमध्ये एक दिवशी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 30 धावा करणाऱ्या सुरेश रैनाला वॉशिंग्टन सुंदरने काल मागे टाकले आहे. 2009 मध्ये रैनाने न्यूझीलंडविरुद्ध 18 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 211.11 चा होता. तर 1992 मध्ये कपिल देव यांचा स्ट्राईक रेट 206.25 होता. कालच्या सामन्यांमध्ये वॉशिंग्टन सुंदरचा स्ट्राइक रेट 231.25 होता. या स्ट्राइक रेट नंतर वॉशिंग्टनने सुरेश रैना आणि कपिल देव यांना मागे सोडले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या सामन्यात संजू सॅमसन बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी आला होता. वॉशिंग्टनने मैदानावर येताच आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने शेवटच्या षटकांमध्ये 16 दोन मध्ये 36 धावा केल्या. वॉशिंग्टनने या खेळी दरम्यान अनेक उत्कृष्ट शॉट मारले. तर 49 व्या षटकात हेनरीविरुद्ध मारलेला शॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरने आपल्या सर्वोत्तम गुणाचे प्रदर्शन केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करत भारत आणि न्यूझीलंडला 307 धावांचे लक्ष दिले होते. या सामन्यामध्ये न्युझीलँडने सात गडी राखून भारताचा पराभव केला आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने नाबाद 145 आणि कर्णधार केन विल्यमसनने नाबाद 94 धावा करत जेतेपद आपल्या नावावर केले.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai 26/11 Attack | ती घटना आजही अंगावर शहारे आणते…वाचा २६/११ ला काय घडलं होत!
- Constitution Day of India | भारतात संविधान दिवस कधीपासून आणि का साजरा केला जातो?, जाणून घ्या!
- Baba Ramdev | “अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”; रामदेव बाबांचं वक्तव्य चर्चेत!
- Eknath Shinde | “आम्ही उघडपणे दर्शनाला जातो, काही लोकं…”; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला
- Yashomati Thakur | बाबा रामदेव यांच्या विधानावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “भगवा परिधान करून खालच्या दर्जाच वक्तव्य…”