मुंबईसह धारवीचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केलं पुन्हा कौतुक

मुंबई: गेल्या महिन्यात आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर धारावी पॅटर्नची दखल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने घेतली होती. त्यानंतर, मुंबईतील रुग्णसंख्या देखील आटोक्यात आल्याने या मुंबई व धरावी पॅटर्नचे  जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ने गौरवोद्गार काढले होते.

तर, आता पुन्हा एकदा जागतिक स्तरावर धारावी व मुंबई महापालिकेचं कौतुक झालं आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी पारदर्शक असून पालिकेचे काम परिणामकारक असल्याचे मत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने काही दिवसांपूर्वी आपल्या लेखातून व्यक्त केले होते. त्यानंतर आता पुन्हा धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला आलेल्या यशाचे कौतुक या वृत्तपत्राने शुक्रवारी विशेष लेखातून केले. धारावीमधील लढ्याने दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या अन्य शहरांसाठी आदर्श निर्माण केला आहे, असे कौतुक या लेखात आहे.

#सामना_रोखठोक:…तर पंतप्रधान मोदींवर देखील राजीनाम्याची वेळ येऊ शकते!

याआधी मुंबई महानगरपालिकेने धारावीसह मुंबईतील कोरोना नियंत्रणासाठी उभारलेल्या लढ्याचं जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं होतं. यानंतर आता अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने देखील या कामाची दखल घेत गौरव केला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना यश आल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी या यशाने हुरळून न जाता यापुढेही कोरोनाविरुद्धचा लढा सुरु राहील, असा निर्धार मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

‘कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा’

तर, दाट लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोना आटोक्यात आल्यानंतर जागितक आरोग्य संघटनेने प्रशासनाचे कौतुक केले होते. यावरून भाजपा-महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र चांगलाच श्रेयवाद रंगल्याचे दिसून आले होते. तसेच, कोरोनाने देशात शिरकाव केल्यापासुन मुंबई व पुणे शहरात रुग्णांचे प्रमाण अधिक होते.आता, मुंबईतील परिस्थिती आटोक्यात असली तरी पुण्यात वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचा आढावा दौरा केला असून उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे पुण्याची जबाबदारी हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली: सुशील कुमार मोदी