मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही वॉशिंग्टन सुंदर : पाहा व्हिडीओ

mohamd siraj

इंग्लंड : इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपुर्वी सराव सामन्याची मागणी केली होती. बीसीसीआयची ही मागणी मान्य करत ईसीबीने काउंटी इलेव्हन आणि भारतीय संघादरम्यान सराव सामन्याचे आयोजन करण्याचे ठरवले.

या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय बॉलर्सनी उत्कृष्ट बॉलिंग केली. यात फास्ट बॉलर मोहम्मद सिराज देखील चमकला सिराजने टाकलेला बॉल चर्चेत आला आहे. सिराजने भेदक बाऊन्सर टाकत वॉशिंग्टन सुंदरची शानदार विकेट घेतली. सुंदर या मॅचमध्ये काऊंटी सिलेक्ट इलेव्हन टीमकडून खेळत आहे. मोहम्मद सिराजच्या या बॉलिंगने सर्वच जण प्रभावित झाले आहेत.

मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या वॉशिंग्टन सुंदरला मोहम्मद सिराजने काही वेळातच तंबूत परत पाठवले. सिराजचा बाऊन्सर इतका अचूक होता की सुंदरला काहीच करण्याची संधी मिळाली नाही आणि बॅटची कडा घेऊन बॉल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला.

या सरावात मोहम्मद सिराजसह उमेश यादवने देखील चमक दाखवली. तर जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे खेळाडू देखील फॉर्मात दिसत होते. यादरम्यान भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कोरोनावर मात करुन परत आला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे आगामी सराव सामन्यात मंयक अग्रवालला पुन्हा संघाबाहेर जावे लागु शकते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP