वाशीम जिल्ह्याला हवे आहे अत्याधुनिक कोविड उपचार केंद्र, माजी आमदारांच्या मागणीला मिळेल का न्याय? 

covid center

वाशीम : जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांची दररोज वाढ होत आहे. झपाट्याने वाढणार्‍या या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरत आहे. सध्या सुरू असलेल्या कोवीड उपचार केंद्रामध्ये सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात विविध ठिकाणी नवीन कोविड उपचार केंद्र तत्काळ सुरू करून आधी सुरू असलेल्या उपचार केंद्रात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आमदार लखन मलिक यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे, की जिल्ह्यात कोविड -१९ चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून, कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच रुग्ण दगावण्याची संख्याही गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत.

परिणामी रुग्णांची गैरसोय होत आहे. नागरिकांनी या महामरीची धास्ती घेतली असून, आपल्या आरोग्याप्रती प्रत्येकाची काळजी वाढली आहे. काही गंभीर रुग्ण दगावल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन कोवीड उपचार केंद्र तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. तसेच शासकीय नियमानुसार खासगी रूग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करावी, तसेच सध्या सुरू असलेल्या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा नसल्याने वद्यकीय अधिकार्‍यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

उपचार केंद्रात आक्सीजन सिलिंडर, सुसज्ज आयसीयु, आवश्यक बेडची व्यवस्था, स्वच्छता, शुद्ध पिकण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णांना लागणारी पुरेशी औषधे अशा आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार लखन मलिक यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

महत्वाच्या बातम्या:-