‘राज्याचं एटीएस झोपलं होतं काय?’ दहशतवादी अटक प्रकरणी भाजपचा सवाल

ashish shelar

मुंबई: दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपकडून यावरूनच तीव्र स्वरुपात टीका केली जात आहे.

राज्यात दहशतवादी मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस एवढा वेळ झोपलं होतं काय? असा संतप्त सवाल भाजपचे आशिष शेलार यांनी केला आहे. यासंदर्भात मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी या दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानात झाले आहे. व दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे. यावरूनच शेलार यांनी ठाकरे सरकार विशिष्ट वर्गासाठी मवाळ भूमिका तर नाही घेत आहे ना? असा आरोपही त्यांनी केला आहे. या दहशतवाद्यांची माहिती पोलिसांकडे तसेच गृहमंत्र्यांकडे होती का, होती तर एवढा वेळ ते काय करीत होते? असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच या गंभीर विषयावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर आणि इतर मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या