Aditya Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बडे उद्योग प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अंधारात ठेवून वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १०० टक्के येणार होता. पण फडणवीसांच्या बैठकीनंतर ऐनवेळी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत एमआयडीसीच्या तत्कालीन सीईओंनी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या चेअरमनना लिहिलेलं पत्र सादर केलं.
या पत्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या एका बैठकीचाही पत्रात उल्लेख असल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केलाय. “एकतर २६ जुलैला या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली होती. ते तर जाहीर आहे. पण २९ ऑगस्ट २०२२ रोजी देवेंद्र फडणवीसांसोबतही झालेली बैठक नेमकी कशासाठी होती? वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प या राज्यात ठेवण्यासाठी होती की दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी होती? या बैठकीबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.
दरम्यान, “मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा एकदा चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाहीय. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “आम्हाला शेंबडी पोरं, तुम्हाला एचएमव्ही पत्रकार…”, आदित्य ठाकरेंनी घेतला देवेंद्र फडणवीसांचा समाचार
- Aditya Thackeray | “मीडियासमोर ‘त्या’ मुद्द्यावर चर्चा करायला या”; आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- Narayan Rane | दिशा सलायिन प्रकरणावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Bacchu Kadu | “ठाकरे-पवारांना जमलं नाही ते शिंदे-फडणवीसांनी केलं”, बच्चू कडूंकडून कौतुकाचा वर्षाव
- Narayan Rane | “कोरोनाच्या औषध खरेदीमध्ये किती चोरी केली ते…”; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप