फडणवीस कोर्टात जातील म्हणून अशी प्रभाग रचना केली का? एकनाथ शिंदे म्हणाले…

eknath shinde vs fadanvis

मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ समितीमध्ये ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. तर, मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, प्रभाग रचनेवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता, त्यावरुन अशी प्रभाग रचना करण्यात आली आहे का? असा सवाल विचारला असता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, ‘न्यायालयात कोणं जातं हे मला माहिती नाही. न्यायालयात कुणीही जाऊ शकतो.

पण राज्य सरकारनं हा जो काही निर्णय घेतला आहे तो कुठलाही राजकीय अभिनिवेश ठेवून किंवा राजकीय फायदा होईल असं डोक्यात ठेवून घेतला नाही. तर या प्रभाग रचनेचा फायदा लोकांना नागरी सुविधा मिळण्यासाठी होईल हाच उद्देश राज्य सरकारनं डोळ्यासमोर ठेवला आहे.’ असे स्पष्ट मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या