राम मंदिराचा वाद कपिल सिब्बल यांना भोवला; गुजरात प्रचारापासून लांब राहण्याचे पक्षाचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा: राम मंदिर वादावर सुरू असलेली सुप्रीम कोर्टातली सुनावणी जुलै २०१९ पर्यंत पुढे ढकलावी, असं कपिल सिब्बल कोर्टात म्हणाले होते. २०१९ च्या निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होईल असंही सिब्बल यांचं म्हणणं होतं. ही मागणी न्यायाधीशांनी फेटाळून लावली. तर रामजन्भूमीच्या निकालाचा आणि निवडणुकांचा काय संबंध असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला होता.

आता याच वादाचा कपिल सिब्बल यांना चांगलाच फटका बसला आहे. सिब्बल यांना गुजरात प्रचारापासून चार हात लांबच रहा असा आदेश पक्षश्रेष्ठींकडून मिळाला आहे. तर, मी सुन्नी वक्फ बोर्डाचा वकील नाहीच, असा धक्कादायक दावा सुद्धा सिब्बल यांनी केला होता. याचाच झटका सिब्बल यांना पक्षाकडून मिळाला आहे.