या वर्षी वरून धवन अडकणार लग्नाच्या बेडीत ?

वरुण धवनसाठी नवं वर्ष खूपच स्पेशल

मुंबई : अभिनेता वरुण धवनसाठी २०१८ नवीन वर्ष आनंदाच ठरलं आहे. यावर्षी वरून धवन लग्न करणार असल्याच्या चर्चेला चांगलच उधान आलं आहे. गर्लफ्रेण्ड नताशा दलालसोबत तो लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. फॅशन डिझायनर नताशा दलाल आणि त्याच्या नात्याची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होती. हि चर्चा खरी ठरेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मे किंवा जून महिन्यात दोघे लग्नाच्या बेडीत अटकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरुण धवनने नुकतंच आई-वडिलांचं घर सोडून स्वत:चं घर घेतलं आहे. खरंतर वरुणला आई-वडिलांसोबतच राहायचं होतं. पण लग्नानंतर वेगळ्या घरात राहण्याची नताशाची इच्छा होती. यावरुनच दोघांमध्ये वादही झाले होते. अखेर वरुणने नताशाचं म्हणणं ऐकलं. त्याने आई-वडिलांच्या घराजवळच नवं घर घेतलं आहे. वरुण लवकरच सुजीत सरकारच्या ‘ऑक्टोबर’ सिनेमात दिसणार आहे.

You might also like
Comments
Loading...