fbpx

मुस्लीम समाजाचा आरक्षणासाठी सरकारला इशारा

muslim arakshan

टीम महाराष्ट्र देशा : सध्या आरक्षणामुळे महाराष्ट्र पेटला आहे. मराठा क्रांती मार्चाने आरक्षणाच्या मागणी करिता मागच्या दोन आठवड्यापासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करीत फडणवीस सरकारला वेठीस धरले आहे. मराठा आरक्षणाची मागणी सध्या चालू असताना धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. यात आणखीन भर मुस्लीम समाजाने घातली आहे. ८ दिवसांमध्ये आरक्षण जाहीर करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा औरंगाबाद मुस्लीम जनजागृती समितीने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे.

आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला असताना दुसरीकडे धनगर समाजानेदेखील एल्गार पुकारला आहे. 1 ऑगस्टपासून धनगर आरक्षणाच्या लढ्याला पुण्यातून सुरूवात करण्यात येणार असल्याचे धनगर समाज आंदोलनाचे नेते उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. यासंदर्भात सोमवारी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समाजाच्यावतीने शासनावर विविध आरोप करण्यात आले.

आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे