आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला अन् टेस्टिंग लॅब सुरू झाली

testing lab

चिखली : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून रुग्ण वाढत असताना आरटीपीसीआर लॅब बंद होती. ही लॅब सुरू काढण्याच आ. श्‍वेता महाले यांनी अनेकदा मागणी केली, मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे आ. श्‍वेताताई महाले यांनी बुलढाणा येथे २५ सप्टेंबर पयर्ंत लॅब सुरू न झाल्यास आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनंतर लगेचच जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर लॅब सुरू करण्याच्या हालचाली सुरू करत करून लॅब ककार्यान्वीत केली. आता नमुने तपासणी सुरू झाली असल्याने रुग्णांचा त्रास कमी झाला आहे.

बुलडाणासाठी लॅबला मंजूर होऊन दोन महिने झाले. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजी अकार्यक्षमपणामुळे लॅब सुरू होत नव्हती. आमदार श्‍वेता महाले यांनी दिलेल्या इशार्‍यामुळे जिल्हा प्रशासनाला सगळी मरगळ झटकून लॅब सुरू करावी लागल्याने आ.सौ.श्‍वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे लॅब सुरू झाली आहे. यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विनंती वरून आत्मक्लेश आंदोलन मागे बुलडाणा जिल्हा हा माँ जिजाऊ साहेबांचा जिल्हा असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ आहे. राज्यभरात ५00 लॅब सुरू झालेल्या असताना बुलडाणा येथे एकही लॅब नसणे अत्यंत दुदैर्वी आहे. यासाठी पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांमुळे आरटीपीसीआर लॅब मंजूर झाली.

परंतु जिल्हा प्रशासनाच्या ढिम्म कारभाराने लॅब सुरू करण्यास दिवसेंदिवस विलंब होत होता. त्यामुळे आ. श्‍वेता महाले यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता . परंतु जिल्हा प्रशासनाने लॅब सुरू केल्याने आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांना सोयाबीनचे सर्वे करण्याची मागणी करण्यासाठी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत व जिल्हा शल्य चिकित्सक श्री घोलप यांनी लेखी पत्र देऊन महाले यांनी आत्मक्लेश आंदोलन करू नये अशी विनंती केल्यावरून आंदोलन मागे घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या :-