NCP | मुंबई : सत्तांतर नंतर राज्यात विरोधक आणि सत्ताधारकांमध्ये वारंवार वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाला थेट इशारा देत धमकवलं आहे.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्तांमध्ये धक्काबुकी झाली. यावरुन भुयार यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी, शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या नंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर तलवारीने हात छाटण्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही ध्यानात ठेवा, जुना देवेंद्र भुयार अंगात आणू नका, असा थेट दमच भुयार यांनी दिला आहे.
देवेंद्र भुयार यांचा इशारा –
मुंबईच्या ठाकरेंची दहशत आजही आहे, कालही होती आणि उद्या सुद्धा आहे. तुमची ही दहशत नदीच्या काठापर्यंत आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या नादाला लागायचे नाही, देवेंद्र भुयारच्या नादाला तर लागूच नका, असा थेट इशारा देवेंद्र भुयार यांनी दिला आहे.
दरम्यान, अलिबाब चाळीस चोरांचं हे सरकार आहे. या सरकारने आमचा कोट्यवधीचा निधी रोखला आहे. काही लोक जाणीपूर्वक बदनामी करत आहेत, भाजपमध्ये जायचं असतं तर ५० खोके घेऊन गेलो असतो, मात्र, लोकांनी माझ्या या वागण्यावर तोंडात शेण घातलं असतं, अशी टीका भुयार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Madhya Pradesh Accident | 14 घरांमध्ये मातम! दिवाळीला निघालेल्या प्रवाश्यांनी भरलेला बसचा ट्रकसोबत भीषण अपघात
- Uddhav Thackeray | “‘पुणे तेथे काय उणे’ असं मिरविणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’चा…”, उद्धव ठाकरेंनी केली भाजपची थट्टा
- Uddhav Thackeray | “पुण्यात राहतोय की पाण्यात?”, पुण्यातील अवकाळी पावसावरून ‘सामना’मधून भाजपवर हल्ला
- Uddhav Thackeray | मातोश्रीवर खलबतं! गौतम अदानी नंतर अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
- Rupali Thombre | “छुपी युती असेल किंवा नसेल ती जगजाहीर करा, कटकारस्थान करू नका”