…तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा

औरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलन सुरू आहे. २० जानेवारीपासून साष्ठपिंपळगाव येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला (दि. १) फेब्रुवारी रोजी पाठिंबा देत साष्ठपिंपळगाव येथुन मशाल रॅली काढणार असण्याचे, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तसेच ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाविषयी स्थगिती उठवली नाही तर, ६ फेब्रुवारी पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी जयळपास ४२ समाज बांधवांनी आपले बलिदान दिले, अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १३७२६ तरुणांवर गंभीर स्थरूपाचे गुन्हे दाखल झाले तरी मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला नाही. सारथीला न्याय मिळाला नाही, तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळाला नसतानाही आरक्षणामधून नियुक्त झालेल्या MPSC व इतर विभागातील तरुणांना नोकऱ्या वर सामावून घेतले नाही. नव्याने सुरू केलेली नोकर भरती रद्द करावी व जातीयवादी मंत्री विजय वड्डेटीवार यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करावी या मागण्या या वेळी करण्यात आल्या.

या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा वतीने १ फेब्रुवारी रोजी साष्ठपिंपळगाव येथून मशाल रॅली काढून क्रांतिचौकात ठिय्या आंदोलनाला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सामन्वयक संजय सावंत यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या