सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना’चे संशयित रुग्ण

टीम महाराष्ट्र्र देशा : कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु,तर ८३० जणांना या विषाणूंची लागण झाल्याची कबुली चीनच्या आरोग्य विभागानं दिली आहे. २९ प्रांतीय विभागात या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं जात आहे. या विभागात १ हजार ७२ नवीन लोकांना या विषाणूंची बाधा झाल्याचा संशय आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

२५ पैकी २४ मृत्यू चीनच्या हुबेई प्रांतात झाले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून चीनच्या ५ शहरांमध्ये प्रवास बंदी करण्यात आली आहे. थायलंडमध्ये तीन जणांना या विषाणूंची बढाझाली होती, पैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. कोरिया, अमेरिका आणि सिंगापूर इथं प्रत्येकी एका रुग्णाला विषाणू बाधा झाली आहे, तर व्हिएतनाम इथं दोन रुग्ण आढळले आहेत.

Loading...

चीनमध्ये एका नव्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात खबरदारी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने केली असून, त्यानुसार दिल्ली, मुंबई आणि कोलकाता विमानतळावर चीनहून येणाऱ्या प्रवाशांची उष्णता लहरी संवेदक अर्थात ‘थर्मल स्कॅनर’द्वारे आरोग्य तपासणी केली जात आहे.

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरससंदर्भात भारतही चिंतेत आहे. चीनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारताने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तेथून येणाऱ्या लोकांना एका स्क्रीनिंग प्रक्रियेतून जावे लागणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.मात्र तरीही मुंबई आणि पुण्यात काही संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.

चीनमार्गे जाणाऱ्या तसेच तिकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी भारत सरकारने एक सूचनावली प्रसिद्ध करून आवश्यक ती खबरदारी घेणाचे आवाहन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चीनमध्ये नव्याने आढळलेल्या ‘कोरोना’ विषाणूची ४१ जणांना बाधा झाल्याचे निदान ११ जानेवारीला झाले आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

हा विषाणू आरएनए रेणूपासून तयार झालेला असून इलेक्ट्रॉन सुक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता तो सूर्याभोवतीची वायुमंडळाची पोकळी किंवा प्रभावळ म्हणजेच ‘कोरोना’ प्रमाणे भासतो. त्यामुळे त्याला कोरोना व्हायरस असे संबोधिले जाते. त्याचा नवा प्रकार चीनमध्ये आढळला आहे.

पाच वर्षाच्या आतील बालकांना न्यूमोनिया, तर पाच वर्षावरील ज्या रुग्णांना अचानक येणारा तीव्र ताप, खोकला, घसा बसणे, दम लागणे, श्वसनास अडथळा या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. असा रुग्ण आढळून आलाच, तर जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष,गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर सुसज्ज ठेवण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये ९ हजार ५०७ रुग्णांपैकी ८ हजार ४२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर हजार ८७ रुग्णांना उपचारा नंतर घरी पाठवलं आहे. दरम्यान, या समस्येला इतक्या लवकर आरोग्य आणीबाणी जाहीर करणं अगतिकता होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण