सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर वॉर्नरने होती ‘अशी’ प्रतिक्रिया

मुंबई : भारतात सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आयपीएल स्पर्धा पहिल्यांदाच अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. या स्पर्धेत गुणतालीकेत सर्वात तळाला असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघासाठी ही स्पर्धा फारच निराशा जनक राहिली. ७ सामन्यापैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवल्यानंतर संघ व्यवस्थापनाने कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून संघाचे नेतृत्व काढुन घेतले.

या प्रकारानंतर अनेक स्तरातुन विविध प्रतिक्रिया उमटल्या. आता खुद्द हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची प्रतिक्रिया समोर आली आहे. हैदराबाद संघाचे सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन यांनी याचा खुलासा केला आहे. जेव्हा वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढण्यात आले. तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले होते. मात्र यादरम्यान वॉर्नरने हा निर्णय मोठ्या खिलाडू वृत्तीने स्विकारला. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक हॅडिन बोलताना म्हणाला की,’वॉर्नर सारख्या खेळाडूला संघाबाहेर बसवणे हा साधा निर्णय नव्हता. टी-२० प्रकारातील वॉर्नर हा दिग्गज खेळाडू आहे.’ असे म्हणाला.

आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्सने ७ सामन्यात केवळ एका सामन्यात विजय मिळवला. तर इतर सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला. स्पर्धेत वॉर्नरने सहा सामने खेळताना २ अर्धशतकासह १९३ धावा केल्या. पण यादरम्यान वॉर्नरचा स्ट्राइक रेट हा ११०.२८ असा होता. जो त्याच्या लौकीकाला शोभेसा नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP