वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नये !

मुंबई : ओखी चक्रवादळामुळे वरळी सी लिंक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची चर्चा रंगत असतांनाच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या मार्गावर वाहनांना धोका नसून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हवामानाची स्थिती पाहून वाहतुकीसाठी सी लिंक वाहतुकीसाठी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.Loading…
Loading...