सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या भक्तीगीताने वारकऱ्यांचे स्वागत

पुणे : संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत पुण्यनगरीत बोपोडी येथे महाराष्ट्राचे  थोर गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भक्तिगीते त्यांचे चिरंजीव आणि सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी सादर करून वारकरी बांधवांना भक्तिरसात चिंब भिजवून प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी जाग्या केल्या, यावेळी चल ग सखे पंढरीला,गेला हरी कुण्या गावा,दर्शन दे रे दे रे भगवंता ,सत्यनारायणाची कथा ,यासारख्या अनेक भक्तीगीतांनी वारकरी बांधवांना एक आगळी वेगळी मेजवानी देण्यात आली.यावेळी वारकरी बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, यावेळी दिंडीप्रमुखांचे स्वागतही करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे ,सुनीता वाडेकर ,परशुराम वाडेकर यांनी केले होते.कार्यक्रमानंतर वारकरी बांधवांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती,
या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

औरंगाबाद विद्यापीठाच्या 43 व्या नाट्य महोत्सवाचे उदघाटन