कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनास वारकऱ्यांचा विरोध, आयोजकांवर गुन्हा दाखल

shivlila

मुंबई : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातच या शो मधील स्पर्धक प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या सहभागामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. परंतु काही दिवसानंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

बिग बॉस घरातून बाहेर पडल्यानंतर नवरात्रीनिमित्त देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळानं शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्यांच्या या कर्तनाला मोठी गर्दी जमली होती. त्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कीर्तन आयोजकांनी आदेशाचं उल्लंघन केल्यानं आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन करून महिला कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचं आयोजन केलं म्हणून आयोजकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवलीला पाटील त्या कीर्तनासाठी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे 9 ऑक्टोबर रोजी आल्या होत्या, यावेळी पोलिसांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांच्या कीर्तनाला दोनशे पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला होता मात्र आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत कीर्तनाचे आयोजन केले. जोपर्यंत शिवलीला पाटील या बिग बॉस संदर्भात माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या किर्तनावर बहिष्कार टाकावा असंही काही कीर्तनकार संघटनांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या