सैराटमधील ‘त्या’ विहिरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू

वेबटीम / करमाळा – ‘सैराट’ चित्रपटामुळे प्रकाश झोतात आलेल्या विहिरीत पडून एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज पहाटे घडली आहे.

मोहन नामदेव बोगळ (वय 75 वाकळी खंडोबा तालुका राहता  अहमदनगर ) असं मृत्यू झालेल्या वारकऱ्याचं नाव आहे. श्री खंडोबा दिंडी सोहळा बुधवारी श्री देवीचामाळ येथे मुक्कामाला आला होता. दिंडीतील वारकरी मोहन नामदेव बोगळ हे पहाटे शौचालयाला जाताना 96 पायऱ्याची विहीर न दिसल्याने ते विहिरीत पडले.

मराठी चित्रपट इतिहासात नवीन रेकॉर्ड तयार करणाऱ्या सैराट चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं होतं. सैराटमध्ये दाखवण्यात आलेल्या 96 पायऱ्याच्या विहिरीत परश्याने उडी टाकली होती. या  दृश्याने सर्वांची मनं जिंकली होती. पण आता याच विहिरीबाबत एक दुख:द घटना घडलीये.

You might also like
Comments
Loading...