नाकाबंदीत पकडलेला युवक निघाला अट्टल चोर

warje police

पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान संशयावरून ताब्यात घेतलेला इसम सराईत चोरटा निघाल्याची घटना पुण्यात घडली आहे. प्रणव विकास चांदगुडे (वय-19, रा. तुषार हाईट्स, शिवणे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलिसांनी कर्वेनगर परिसरात केलेल्या नाकाबंदी दरम्यान आरोपीला 26 ऑगस्ट रोजी संशयावरून ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्या जवळील सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी रॉड, लेडीज पर्स, चांदीचे तीन पैंजण व रोख सात हजार रुपये आढळले होते. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दतील आठ, उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणी पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून 708 ग्रॅम सोन्याचे दागिने(किंमत 17 लाख 72 हजार) 900 ग्रॅम चांदीचे दागिने(किंमत 36 हजार) तसेच 36 हजार रोख असा 18 लाख 44 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सिताराम धावडे, सहायक पोलीस फौजदार जगन्नाथ गोरे, पोलीस कर्मचारी अमर भोसले, बाला रफी शेख, संतोष देशपांडे, चंद्रकांत जाधव, सुधीर पाटील, सुभाष गुरव, विजय कांबळे, संजय दहिभाते व संदिप शेळके यांनी केली