वारीस पठाण यांच्या ‘वादग्रस्त’ वक्तव्याचा ; देवेंद्र फडणवीस यांनी घेतला ‘खरपूस समाचार’

टीम महाराष्ट्र देशा : भारत देशात १०० कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे,, हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम राष्ट्रामध्ये कुणी बोललं असतं, तर तेथे काय अवस्था झाली असती? हे वारिस पठाण यांनी लक्षात घ्यायला हवं.अशा शब्दात भाजपचे नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारिस पठाण यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.फडणवीस नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की “वारिस पठाण यांचं वक्तव्य निंदनीय आहे. या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहेभारत हा सहिष्णू देश आहे. हिंदू समाज हा सहिष्णू आहे. मात्र, हिंदू समाजाच्या सहिष्णूतेला जर हिंदू समाजाची दुर्बलता कुणी समजत असेल, तर तो त्यांचा मुर्खपणा ठरेल. त्यामुळे अशाप्रकारचं वक्तव्य या ठिकाणी खपवून घेतलं जाणार नाही हे पठाण यांनी लक्षात घ्यावं, अशा शब्दात पठाण यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत फडणवीस यांनी वारीस पठाण यांना चांगलेच फैलावर घेतले.

Loading...

त्याचबरोबर कालच्या वक्तव्याबद्दल वारिस पठाण यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात फुत्कार सोडले होते. CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले होते,की आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा