वारीस पठाण यांना ‘विश्व हिंदू परिषदे’चा इशारा ; ‘भारताचा इतिहास पाहून तोंड बंद ठेवावं’

टीम महाराष्ट्र देशा : एम आय एम या पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकी वजा आहे. त्यांनी आधी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकावल्याचा चांगला परिणाम होणार नाही, असे सडेतोड उत्तर विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी वारीस पठाण यांना दिले आहे.

परांडे पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.आमदार वारिस पठाण यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त व्क्तव्य केलं होतं. या सभेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading...

कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात फुत्कार सोडले होते. CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले, आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली होती.

‘इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, दोन समाजात फुट पडेल अशी भाषा नेते वारिस पठाण यांनी वापरली आहे.मागे याच पक्षाचे नेते अकबरुद्दिन ओवेसी यांनी देखील हिंदूंना चिथावणी देण्याची भाषा केली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश