‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केल्याचा माझा गुन्हा अल्लाने माफ करावा : वारिस पठाण

मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केल्याबद्दल माफ करा, असं म्हणत एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिम समुदायासमोर अक्षरशः माफी मागितली आहे. गणेशोत्सवादरम्यान ‘बाप्पा मोरया’ची घोषणा दिल्याबद्दल वारिस पठाण माफी मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या संदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले असून,वारिस पठाण यांनी ‘बाप्पा’चा जयघोष केलेल्या व्हिडिओची तसंच माफी मागितल्याच्या व्हिडिओची सत्यता ‘महाराष्ट्र देशा’ने तपासलेली नाही.

नेमकं काय म्हणाले आहेत माफी मागताना ?
‘काही दिवसांपूर्वी माझ्या तोंडून शब्द निघून गेले. माझ्याकडून चूक झाली. अशी चूक पुन्हा होणार नाही. मी एक माणूस आहे. प्रत्येक माणसाकडून चूक होते. अल्लाने माझा गुन्हा माफ करावा, यासाठी प्रार्थना करा.’