Wari- विठुरायाच्या गजराने दुमदुमली अवघी देहू

तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहू: प्रत्येकाच्या मुखातून विठुरायाचा नामघोष सोबतीला टाळ-मृदुगाचीसाथ अशा भक्तिमय वातावरणात आज दुपारी देहूगावातून तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. दरवर्षीप्रमाणे  याही वर्षी हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी झालेत

आज पहाटेपासूनच मंदिरात पालखी प्रस्थानाचे पारंपरिक धार्मिक विधी सुरू होते. महाआरती झाल्यानंतर पालखी मंदिरातून बाहेरून आली तेव्हा ‘तुकाराम तुकाराम’ चा एकच जयघोष झाला. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून बाहेर पडली.
पालखीचा पहिला मुक्काम मुख्य मंदिरापासून जवळच असलेल्या इनामदार वाड्यात असणार आहे