वर्धा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी म्हणजे कुंभकर्णाची झोप : नरेंद्र मोदी

narendra modi vr congress

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी म्हणजे कुंभकर्णाची झोप आहे. हा कुंभकर्ण सत्ता मिळाल्या नंतर झोपी जातो आणि सहा महिन्यांनी जाग आल्यावर जनतेचे पैसे खाऊन पुन्हा झोपी जातो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कॉंग्रेस आघाडीला लक्ष केले.आज पंतप्रधन नरेंद्र मोदी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना त्यांनी वर्ध्याच्या सभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलेच शाब्दिक फटकारे मारले.

यावेळी मोदी म्हणाले की, कॉंग्रेसच्या सत्ताकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्यांनी लक्ष दिले नाही. आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे शरद पवार यांनी मावळात शेतकरी हक्क मागत असताना त्यांना गोळ्या घातल्या. तसेच महाराष्ट्रातीलच असणारे शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री होते, मात्र तरीही राज्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत. पण भाजप ने ती अपूर्ण काम पूर्ण केली.

दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला विशेष लक्ष केले मोदी म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात आता कौटुंबिक कलह निर्माण झाले असून आता पुतण्यानेच काकांना हिट विकेट केले आहे. तसेच शरद पवार हे कुशल राजकारणी असून त्यांच्या प्रयेक कृती मागे काहीना काही कारण असते. त्याच प्रमाणे शरद पवार यांनी पुढे येणाऱ्या परिस्थितीचा वेध घेत या निवडणुकीतून पळ काढला आहे.