कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये वार्डनिहाय स्वच्छता मोहीम!

बीड: शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील मोठ्या संख्येने वाढत आहे, त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी आता कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत तसेच जे नवीन रुग्ण येत आहेत त्यांच्यासाठी खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

आता पावसाला तोंडावर येत आहे त्यामुळे सर्वत्र स्वच्छता मोहीम देखील सुरु करण्यात येणार आहे. स्वच्छता नसल्याने साथरोग तसेच इतर आजारांचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कोरोनाचा संसर्ग अजून पसरू नये म्हणून आ. संदिप क्षीरसागर स्वच्छतेची टीम घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. दोन अत्याधुनिक सॅनिटायझर फवारणी यंत्रे जे की इमारतीच्या दोन मजल्यापर्यंत सॅनिटायझर फवारणी करू शकते यासह जेसीबी, ट्रॅक्टर, शंभर मजुरांचा ताफा या मोहिमेत असणार आहे.

बीड शहरात सध्या कोरोना रूग्ण संख्या वाढू लागली आहे. जिल्हा रूग्णालय बीड शहरात असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील रूग्णांच्या नातेवाईकांचाही संपर्क बीड शहरात येतो. परिणामी बीड शहरातील रूग्णसंख्या वाढते असे दिसून आले आहे. त्यात शहरातील नाले व पावसाळापुर्व स्वच्छता मोहिम चांगल्या पद्धतीने झाली नसल्याने साथरोग पसरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरात कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखला जावा, साथरोग पसरले जावू नयेत यासाठी आ. क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात विशेष स्वच्छता मोहिम राबवली आहे. या स्वच्छता मोहिमेला आधुनिकतेचे बळ देत आ. क्षीरसागर यांनी शहरात तगडे नियोजन केले असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या