खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची ‘वॉर रूम’

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील खड्डे बुजवण्यासाठी १५ डीसेंबरची डेडलाईन सावर्जनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली होती. आता अवघे काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. राज्यातील तब्बल ९७ हजार इतक्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मुंबईत मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात चक्क वॉर रूम तयार करण्यात आली आहे.

राज्यातील ९७ हजार किलीमीटर एवढ्या मार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहे. १५ डीसेंबर ही खड्डे बुजवण्याची शेवटची तारीख असल्याची माहिती मागील काही दिवसांपूर्वीच निश्चित करण्यात आली आहे. या सर्व कामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आत मंत्रालयात ब्न्व्यात आलेल्या वॉर रूम मधून जिल्हानिहाय लक्ष ठेवण्यात येणार आहे.

या वॉर रूम मधून सर्वच कामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिन्यामधील महत्वाचे रस्ते प्रथम खड्डेमुक्त करणे, गुगलच्या साह्याने सर्व मार्गाचे परीक्षण करणे, प्रत्येक दिवसाला किती रस्ते खड्डेमुक्त झाले. प्रत्येक विभागातील मुख्य अभियंत्याला विशेष निधी व अधिकार अश्या विविध कामांवर लक्ष ठेवण्याचे मुख्य काम याच वॉर रूम मधून केले जाणार आहे