मुंबईतले ठाकरे मला काही करू शकले नाही तर हे नगरच्या कोपऱ्यात बसलेले पवार काय करणार ?

nilesh-rane-rohit-pawar

मुंबई : मुंबईतले ठाकरे मला काही करू शकले नाही तर हे नगरच्या कोपऱ्यात बसलेले पवार काय करणार, असे म्हणत भाजप नेते आणि माजी खा. निलेश राणे यांनी आ. रोहित पवार यांच्याशी सुरु असलेल्या ट्विटर वॉरवर भाष्य केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले की, मी साखर उद्योगाबाबत प्रश्न विचारलेला असताना रोहित पवारांनी त्याला नको ते वळण दिलं. मला कोणाशीही वैयक्तिक दुष्मनी करण्यात रस नाही, परंतू आमच्यावर टीका होत असेल तर आम्ही शांत राहणार नाही. मुंबईतले ठाकरे आमचं काही करु शकले नाही तर नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार?? असे निलेश राणे म्हणाले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे आणि आ. रोहित पवार यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. साखर कारखान्यांच्या ऑडीट बाबत केलेल्या ट्विटवरून या शाब्दिक युद्धाला सुरवात झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित साखर उद्योगाला मदत करावी अशी विनंती केली होती. यावर निलेश राणे यांनी साखर कारखान्यांचे ऑडीट करावे असे ट्विट केले.

यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले. शरद पवारांनी पंतप्रधानांना कुक्कुटपालन व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही उपाययोजना सुचवल्या आहेत, अशी बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली. यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीचं जुंपली.

महत्वाच्या बातम्या

#Coronavirus : ‘कोरोना उपचाराच्या जाहिराती कराल तर खबरदार’

नको तेच झालं ! रुग्णसेवा करताना डॉक्टरांनाचं झाला कोरोना

#महाराष्ट्र_बचाओ : संजय राऊतांनी भाजपाच्या निदर्शनांची खिल्ली उडवली, म्हणाले…