साप साप म्हणून म्हणून भुई धोपटायचा प्रकार खैरेंनी थांबवावा: रामदास कदम

रामदास कदम

औरंगाबाद: जिल्हा नियोजन बैठकीसाठी आज पालकमंत्री रामदास कदम औरंगाबाद शहरात आले होते याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी खैरे यांना चांगलेच फटकारले, खासदार चंद्रकांत खैरे यांनी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावर जोर दिला आहे या मुद्द्यावरून आता शिवसेना नेत्यांमध्येच एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे, आपण यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खैरे यांनी रविवारी सांगितले होते. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेने उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपाकडून शिवसेनेला श्रेय मिळू नये, म्हणून प्रयत्न केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. यावरून आता राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरेंना फटकारले आहे.

‘खैरे दिल्लीत आहेत ना ? राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पहावं. गरज पडली तर वेलमध्ये बसावं. पण हा साप साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा असा टोला कदम यांनी लगावला. पुढे बोलताना कदम म्हणाले की हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. खासदार चंद्रकांत खैरे दिल्लीत असतात. त्यांनी त्यावर आवाज उठवावा. वेळ पडली तर वेलमध्ये बसावं. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला नसेल तर तसं सांगावं, त्याबद्दल पाठपूरवठा केला जाईल असे रामदास कदम यांनी सांगितले.Loading…
Loading...