राष्ट्रवादी कोणत्या दिशेने चालली, हे वरिष्ठ नेते चांगलं जाणून आहेत; शिवसेना नेत्याची उघड नाराजी

shivsena ncp

पारनेर : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणल्यानंतर हे फोडाफोडीच राजकारण पहिल्यांदाच झाले असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत आहेत. हे तीन पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं विरोधकांच मत असून, आज बारामती मध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या प्रवेशाने पुन्हा सरकार मध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. तर या कोरोनाच्या महामरी काळात पुन्हा सुरु झालेल्या राजकारणामुळे नक्कीच वेगवेगळे अर्थ उपस्तिथ होत आहेत.

घाबरून न जाता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा; धनंजय मुंडेंचे आवाहन

यावर आता शिवसेनेचे नेते आणि पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी मौन सोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी कोणत्या दिशेने चालंली आहे, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ जाणून आहेत. त्याबद्दल तेच जास्त चांगले बोलू शकतील. अस परखड मत विजय औटी यांनी मांडल आहे

याविषयी मी काही बोलणार नाही. पक्ष शिस्तीप्रमाणे प्रत्येक पक्षाचे काही संकेत असतात, तसे शिवसेनेत देखील आहेत. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते व वरीष्ठ नेते या पक्ष प्रवेशाविषयी बोलतील. राज्यात तिन्ही पक्षाचे एकत्र सरकार आहे, राष्ट्रवादी आपला पक्ष कशा पद्धतीने वाढवत आहेत, हे आता वरीष्ठांना समजले आहे, मात्र त्याबाबत काय करायचे व काय भूमिका घ्यायची, हे आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारा.अस औटी म्हणाले आहेत.

बंद शाळांना आली भरमसाट वीजबिलं, महावितरणच्या कारभारावर शिवसेनेचे ताशेरे