fbpx

श्रेयवादावरून मुरकुटे-गडाखांमध्ये जुंपली

नेवासा: नुकतेच खुपटी- पुनतगाव रस्त्याचे भूमिपूजन पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते झाले आहे. यावरून नेवासा तालुक्यात राजकीय चर्चा होत आहे. हा रस्ता आमदारांचा की जिल्हा परिषद सदस्यांचा यावरून आता तालुक्याच राजकारण चांगलच तापल आहे. दरम्यान, भूमिपूजन करताना तालुक्याचे प्रतिनिधी यानात्याने विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना कळविणे आवश्यक होते त्यामुळे मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून हक्कभंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा सभापतींनी खुलासा करावा असा सवाल उपस्थित केला आहे .

याला जि. प सदस्य मीना शेंडे यांनी उत्तर देऊन या प्रकरणाला वेगळच वळण दिल आहे.

काय म्हणाल्या मीनाताई शेंडे

हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असल्याने उदघाटन कोणी करावा हा आमचा प्रश्न आहे लोकप्रतिनिधींचा यात काहीही संबंध. रस्त्यासाठी जिल्हापरिषद मधून निधी मिळाला आहे.

तर या कामात तुमच काहीच योगदान नसल्याचा टोला आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सुनिता गडाख यांच्यासह मीना शेंडे यांना लावला आहे.

खुपटी – पुनतगाव रस्त्याच्या मंजुरीसाठी ‘तुमचे’ काहीही योगदान नाही – आमदार बाळासाहेब मुरकुटे

सण २०१६-१७ मध्ये खुपटी ते पुनतगाव हा ग्रामस्थानी मागणी केलेला हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग मार्फत रस्ता दुरुस्ती मधून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पंकजा मुंडे यांच्या कडे शिफारस करून मंजूर केलेला हा रस्ता आहे. त्यावेळेस शेंडे या भा.हिवरा गटाचे सदस्या देखील नव्हत्या किंवा सुनीताई गडाख सभापती नव्हत्या किंवा पंचायत समिती कडून या रस्त्याची मागणीही झालेली नव्हती तेव्हा या रस्त्याच्या मंजुरी मध्ये आपले काही योगदान नाही. तेव्हा आपण श्रेयासाठी खटाटोप करू नये व आपण शासनाकडे नवीन प्रस्ताव दाखल करून उदघाटन करावी अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.

2 Comments

Click here to post a comment