मंत्रिमंडळ बैठकीआधी मंत्र्यांची बैठक सुरू ; शिवसेना-भाजपात जुंपणार

shivsena vs bjp

टीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपात जुंपण्याची शक्यता आहे, आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीआधी मंत्र्यांची बैठक सुरू झाली असून नाणार प्रकल्प अधिसूचना रद्द केल्याची घोषणेवरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने उभा ठाकले आहेत.

Loading...

नाणार प्रकल्पांवरून भाजपा शिवसेनेत वाढलेल्या तणाव पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. नाणार प्रकल्प अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत केली होती . त्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी अधिसूचना रद्द केली नाही अस सांगत शिवसेनाला चांगलाच तोंडघशी पाडलं आहे.

तेव्हा आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेहमीप्रमाणे मूक गिळून गप्प बसतात की मुख्यमंत्र्यांना धारेवर धरतात याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागल आहे.

दरम्यान, अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार देसाई यांना नसल्याचा खुलासा करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची गोची केली. नाणार प्रकल्पवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीएम फडवणीस यांच्यावर ही जोरदार टीका केलीय.Loading…


Loading…

Loading...