fbpx

पाटील-बागल पुन्हा आमने-सामने ; ऐन थंडीत तालुक्यातील राजकारण तापलंं

करमाळा : राजकारणामुळे सतत चर्चेत असलेल्या करमाळा तालुक्याचे वातावरण ऐन थंडीच्या काळात पुन्हा गरम झाले असून शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

२०१४ विधानसभा निवडणूकीत आमदार नारायण पाटील २५७ मतांनी विजयी झाले होते, पराभूत उमेदवार रश्मी बागल यांनी पोस्टल मतांची फेरमतमोजणी व्हावी यासाठी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती, अखेर या याचिकेचा निकाल लागला असून रश्मी बागल यांची याचिका फेटाळून लावत नारायण पाटील यांची झालेली निवड योग्य असल्याचे कोर्टाने निकाल दिला आहे.

यामुळे पाटील-बागल पुन्हा एकदा आमने-सामने आलेले असून, “हा विजय सत्याचा असून विधानसभा निवडणूकीत कौल मान्य करायला पाहिजे होता, तसे न करता रश्मी बागल यांनी विनाकारण चार वर्षे जनतेची दिशाभुल केली असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी केले. तर आम्हाला पराभव मान्य होता कार्यकत्यांच्या आग्रहाने आम्ही याचिका दाखल केलेली होती, आगामी विधानसभेला तयारीने या मग बघू असा पलटवार राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी केल्यामुळे आता तालुक्यातील राजकारण पेटलेले असून पुन्हा एकदा करमाळा तालुका चर्चेत आलेला आहे.

1 Comment

Click here to post a comment