धनंजय मुंडेंच्या आक्रमक परळीच्या सभेनंतर पंकजा मुंडेच्या गावोगावी भेटी !

टीम महाराष्ट्र देशा: विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ‘हल्लाबोल’ मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्य आपल्या झंजावती आणि आक्रमक सभांनी पिंजून काढले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या दुसऱ्या टप्प्यातील ‘हल्लाबोल’ मोर्चा मराठवाड्यात सुरु आहे. या मोर्चात धनंजय मुंडेंची परळी मधील सभा चांगलीच गाजली होती. याच सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्यात असल्याच बोलून पंकजा मुंडेंवर निशाना साधला होता.

Loading...

परळीच्या धनंजय मुंडेंच्या या सभेला परळीकरांचा तुफान प्रतिसाद सुद्धा लाभला होता. हा प्रतिसाद पाहून कदाचित पंकजा मुंडेंच्या पायाखालची वाळू सरकली असावी त्यामुळेच आता त्यांनी ‘गांव तिथे विकास’ यात्रा काढत परळी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात भेटी देण्यास सुरवात केली आहे.

पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात ‘गांव तिथे विकास’ झंजावती दौरा

सत्तेच्या माध्यमातून परळी मतदारसंघाच्या विकासाचा सातत्याने ध्यास घेणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे२५ जानेवारीपासून मतदारसंघात गांव तिथे विकास दौरा करत आहेत. या दौ-याच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील मूलभूत विकास योजना जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहेत.

२५ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. तपोवन येथील महादेवाचे दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी विकास दौ-याला प्रारंभ करणार केला. संबंधित गावात झालेली विकास कामे, विविध योजनांतून मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन तसेच काही कामांचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. गावच्या समस्यांविषयी यावेळी त्या ग्रामस्थांशी संवादही साधणार आहेत. गांव तिथे विकास दौरा संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गांव, वाडी, तांडा व वस्तीवर टप्प्याटप्प्याने जाणार आहे.

असा आहे विकास दौरा

२७ जानेवारी सकाळी ९ डिग्रस, १० वा. पोहनेर, ११.३० वा. बोरखेड, दुपारी १२.३० वा. तेलसमुख, १ वा. तेलसमुख तांडा, १.३० वा. तेलसमुख दलित वस्ती, २ वा. तेलसमुख तांडा क्र.(२), २.३० वा. ममदापूर तांडा, ३ वा. ममदापूर, ४ ते ५ वा. कृष्णानगर तांडा, श्रीरामनगर तांडा, गणेशनगर तांडा, ५.३० वा. कौडगांव गव्हाणे, सायंकाळी ६.३० वा. आचार्य टाकळी, रात्रौ ७.३०वा. वसंतपूर तांडा, ८ वा. कानडी आणि ९ वा. पिंपरी

२८ जानेवारी सकाळी ९ वा. सेलू सफदराबाद क्र. (१ व २), १० वा. मलनाथपूर, ११ वा. परचुंडी, दुपारी १२ वा. भिलेगांव, १ वा. रेवली तांडा, २ वा. रेवली, ४ वा. वाका, ४.३० वा. घनाळ तांडा क्र.१, ५ वा. घनाळतांडा क्र.२, सायंकाळी ५.३० वा. नाईकनगर तांडा आणि रात्रौ ७.३० वा. सिरसाळा येथे पंकजा मुंडे जाणार आहेत.

२०१९ मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात परळी विधानसभा निवडणुकीत सरळ लढत होणार आहे. अशात राज्याच नेतृत्व करण्याचा मानस दाखवणारे हे दोन्ही नेते आपल्या मतदारसंघात सुद्धा आता तयारीला लागले आहेत. राज्याचे ‘स्टार प्रचार’ असणारे हे भाऊ-बहिण मतदारसंघाला न्याय देऊ शकतात का ? आणि या राज्यातील सगळ्यांचे लक्ष लागलेल्या लढाईत नक्की कोण बाजी मारणार हे पाहण्यासारख असणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का