वक्फ मंडळ आक्रमक: ठाणे, पुणे, बीड, परभणीसह ५ ठिकाणच्या घोटाळ्यांची सीआयडी चौकशी

वक्फ मंडळ आक्रमक: ठाणे, पुणे, बीड, परभणीसह ५ ठिकाणच्या घोटाळ्यांची सीआयडी चौकशी

Waqf board

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे सर्व सदस्यांची वक्फ मालमत्तांचे कोट्यावधी रुपयांचे महाघोटाळे संबंधी महत्त्वाची बैठक पार पडली. वक्फ मालमत्तेचे अवैधरित्या हस्तांतरित करुन कोटयावधी रुपयांचा महाघोटाळ्यात महाराष्ट्रात ठाणे, बीड, पुणे, परभणीसह पाच ठिकाणी विविध कलमांतर्गत ५ गुन्हे नोंदवुन कायदेशिर कार्यवाही करण्यात आली. सदरील सर्व प्रकरणाच्या चौकशी अहवालात बोगस एनओसी द्वारे कोट्यावधी रुपयांची हेरफेर करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामध्ये महसुल विभाग व वक्फ बोर्डाचे काही अधिकारी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत असल्याने सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विविध पोलीस ठाण्यातंर्गत दाखल झालेले गुन्ह्यांची सखोल चौकशी करण्यासाठी सर्व प्रकरणे सीआडीकडे देण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली.

बैठकी दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील पोलीस आयुक्त व अधिक्षकांना वक्फ मालमत्ता घोटाळा व फसवणुकी संबंधीचे उघड होणाऱ्या प्रकरणात तात्काळ सखोल चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे लेखी आदेश निर्गमित करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांना दिले आहेत.

याबैठकीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे सदस्य खासदार इम्तियाज जलील, खासदार फौजिया खान, आमदार वजाहत मिर्झा, खालेद बाबु कुरैशी, ए.यु. पठाण, समीर काझी, मुदस्सिर लांबे, शेख हसनैन शाकेर, मौलाना हाफीज अथर अली यांच्यासह वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या