ठाणे : पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या ठाण्यातील उत्तर सभेची सुरुवात केली. यावेळी वसंत मोरेंनी कोरोना काळात मनसेने काय काय केले, लोकांना तेव्हा मनसे का आठवली, निवडणुकीवेळी का आठवत नाही? असे बोलून नाराजी व्यक्त केली.
पुण्यात मनसेने काम केले. “गोरगरीबांना फायनान्स, बँका वाल्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. अशावेळी मनसेची दारे उघडी होती. लोकांना फायनान्स वाला, बँकेवाला दारात आला की मनसेवाला आठवतो. जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मनसेवाला कुठे जातो, तेव्हा का नाही मनसेवाला आठवत”, असा प्रश्न उपस्थित केला. ब्लू प्रिंट साहेबांनी आणली, पुण्यात मनसेचे आम्ही दोनच नगरसेवक आहोत. ती ब्लू प्रिंट कशी राबविली हे कात्रजमध्ये येऊन पहा. शंभरावर नगरसेवकांना जे जमले नाही ते आम्ही दोघांनी केले. पालिकेचा पुरस्कारही मनसेच्या नगरसेवकाला मिळाला, असे वसंत मोरे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, “सोळा वर्षांमध्ये १६ गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक. मला पुरस्कार देताना चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे होत्या. पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, मी गेली १५ वर्षे भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होतोय, असा किस्साही त्यांनी सांगितला”. घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला राज ठाकरेंच्या सभेला हजर राहिले असताना पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –