वानखेडेंचा पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप; गृहमंत्री वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

दिलीप वळसे पाटील

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीन वानखेडे यांनी पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला लक्ष केले आहे. आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश पोलिसांना दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले. मात्र आता पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, सीबीआयनं डीजीपी व मुख्य सचिवांना समन्स पाठवल्याचं आपल्याला माहित नाही. रश्मी शुक्ला प्रकरणात सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना साक्षीसाठी बोलावलं आहे. राज्यामध्ये गुन्हेगारी, महिला अत्याचार आदी मुद्यांचा आढावा घेण्यासाठी दुपारी दोन वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, असे वळसे पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या