मालाडमध्ये पुन्हा भिंत कोसळली, एकाचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात २० पेक्षा जास्त जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना ताजी असताना मालाडमध्येच पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे.

ही घटना पिंपरीपाडा येथील शिवनेरी हायस्कूलजवळ ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच पुण्यातच सिंहगड कॉलेज परिसरात भिंत कोसळून सहाजण मृत्युमुखी पडले होते.

दरम्यान, या सर्व घटनांना प्रशासनचं जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या घटना वारंवार होत असल्याने प्रश्नाला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.