सर्वेक्षण अहवालाची धास्ती, जनसंपर्क वाढविण्यासाठी पदयात्रा काढण्याच्या भाजप आमदारांना सूचना

bjp flag

मुंबई : भाजपाच्या 40 टक्के आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचं पक्षाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणाची भाजपा नेतृत्त्वानं चांगलीच धास्ती घेतली आहे. मतदारसंघात पदयात्रा करा, लोकांना भेटा, अशा सूचना प्रदेश भाजपानं सर्व आमदारांना दिल्या आहेत.

शेतीशी संबंधित प्रश्न, दुष्काळसदृश्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनतेत सरकारविरोधात नाराजी आहे या प्रश्नांवर लक्ष देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. ‘महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत. गांधींचं जयंती वर्ष विधायक कामानिमित्त लक्षात राहावं, यासाठी ही पदयात्रा केली जाणार आहे,’ अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. ‘संपर्क अभियान कशा पद्धतीनं राबवायचं, त्याचा नेमका हेतू काय, पक्षाला यातून नेमकं काय अपेक्षित आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती 121 आमदारांना देण्यात आली आहे,’ असं देखील या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

भाजपच्या वेबसाईटवर चक्क ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा